बातमीपत्र

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने बिबी येथील महर्षी पतंजली साधना योग पिठ  येथे  गोरगरीब जनतेच्या सुख-दुःखला व अडीअडचणींना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचे मान, शान आणि अभिमान असणारे पेन व डायरी हे साधन देऊन येथेच्छ  सत्कार करण्यात आला.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी पूजन करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर सत्कार कार्यक्रमात विविध वृत्तपत्राचे तथा टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधींचा गोर सेना जिल्हा संपर्कप्रमुख वितेश चव्हाण यांनी व इतर मान्यवरांनी पुष्पगुच्छ पेन आणि डायरी सप्रेम भेट देऊन सत्कार केला. यावेळी तालुक्यातील सर्वच पत्रकार बांधव उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या