स्वप्नांना भरारी घेता येतेच,साहित्यिक वाटेवरचे पहिले पाऊल "काव्यांकुर" या कविता संग्रहाच्या प्रकाशनाने अनुभवता आले असे उद्गार डॉ.संतोष सावंत यांनी काव्यांकुर या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त काढले.१४ एप्रिल,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधत मनसे नेते मा.बाळा नांदगावकर तसेच मा.नगरसेविका मा.डॉ.प्रा.अनुराधा पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत चैत्यभूमी येथे संपन्न झाला.
"काव्यांकुर" तील अंकुर वटवृक्ष होईलच.आता पूढे पाऊल टाकलेच आहे.महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविताविश्वा प्रमाणे विद्रोही,जहाल,प्रखर,व्यवस्थेच्या विडंबनात्मक विषयांवर "भाष्य" तसेच "काव्यरचना" करत सामाजिक भावना जागृत करण्याचा नवा मानस उरी बाळगत कवीने हा प्रथम काव्यसंग्रह आपल्या वाचनात आणल्याचे सांगितले आपल्या सर्वांचा आशीर्वाद व प्रेम मिळेल अशी खात्री यावे डॉ.संतोष सावंत यांनी व्यक्त केली.त्यांच्या या प्रवासाला लाईव्ह महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.