बातमीपत्र

मालाडच्या दैवज्ञ प्रीमियर लीगच्या चषकाचे अनावरण विशाल कडणे यांच्या हस्ते जल्लोषात

मालाडच्या दैवज्ञ प्रीमियर लीगच्या चषकाचे अनावरण विशाल कडणे यांच्या हस्ते जल्लोषात

 दैवज्ञ समाजातील युवकांसाठी मालाड येथे आयोजित Daivadnya Premier League च्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या चषकाचे अनावरण आज भांडुप येथे विशाल कडणे यांच्या निवासस्थानी पार पडले. समाजसेवक जयवंत (गुंडु काका) मालणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आजचा दिवस ठरवण्यात आला होता. सदर प्रसंगी सर्वश्री विजय दादा कडणे, गौरव पोतदार, वैभव भुर्के, भुषण गवाणकर, सुखदा कडणे उपस्थित होते. बृ मु म पा आरोग्य दक्षता समिती सदस्य विशाल भाई कडणे यांनी कार्यक्रमाची सर्व रुपरेषा समजुन घेतली व कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले. प्रथम पारितोषिक समाजश्रेष्ठी स्व  जगन्नाथ भाई पेडणेकर व द्वितिय पारितोषिक दैवज्ञ पतपेढी संस्थापक स्व गोपिनाथ भाई कडणे यांच्या स्मरणार्थ विशाल कडणे यांच्या सौजन्याने देण्यात येत असल्याचे आयोजंकाच्या वतीने श्री भुषण गवाणकर यांनी सांगितले.


साप्ताहिक बातम्या