काकाच्या मुद्य मालावर पुतण्याचा डल्ला आरोपी पकडण्यात लोणार पोलिस यक्षस्वि मुद्य मालासह आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी लोणार तालुक्यातील ग्राम चिंचोली सागळे येथे 21 डिंसेंबर रोजी दुपारी 1ते4वाजे दरम्यान घरातील लोखंडी कपाटातील नगदी 9लाख 10हजार,500 रूपये व सोन्याचे दागिने 14तोळे 9 ग्राम किमंत 5लाख 96हजार रुपये किंमतीचे असे एकूण 15लाख 06हजार 500रुपये चोरीला गेल्याची तक्रार भास्कर सोनाजी जाधव यानी लोणार पोलिस ठाण्यात दिली.पोलिसांनी गुप्त बातमिदार नेमुन माहिती घेतली असता तक्रार दार यांचा पुतण्या विशाल सुभाष जाधव यास अटक करून लोणार न्यायालयात हजर केले असता आरोपी स दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून आरोपी कडून मुद्देमाल व सोन्याचे दागिने ऐकुन 13लाख 56 हजार रुपये हस्तगत करण्यात आले.
