बातमीपत्र

राजू शेट्टींनी सरकारविरोधात दंड थोपटले; संपूर्ण कर्जमाफीसाठी बुधवारी भारत बंद

सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी 8 जानेवारीला देशभर बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून या दिवशी शेतकऱ्यांची काय ताकद आहे, हे सरकारला समजेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळी आणणार कोठून? साताबारा कोरा करू असं म्हणाला होता, मग आता सरकार आलं आहे. सातबारा कोरा झाला काय? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय पवारांची औलाद सांगणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. आता सरकार आलं आहे. मग सातबारा कोरा झाला काय?
कर्जमाफी करण्यासाठी पैसे नसतील तर सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचं शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळी आणणार कोठून? परवडत नाही म्हणून पिकवलं नाही, तर शेवटी आयातच करावं लागेल, अशा शब्दात शेट्टी यांनी शिवथाळीवर टीका केली आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा