बातमीपत्र

राजे समरजीत घाटगे यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भुदरगड तालुक्याच्या दौऱ्यावर

गारगोटी दि. २५
कोल्हापूर जिल्हा हा आमच्यासाठी राजकिय कोंढाणा आहे.तानाजी मालुसरे सारखे छत्रपती शिवरायांचे मावळे बनून हा कोंढाणा आपण पून्हा जिंकायचा आहे यासाठी मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात शेतकरी म्हणून सहभागी होण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी शेत.कऱ्यांशी संवाद साधून जास्तीत जास्त शेतकरी सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजे समरजीत सिंह घाटगे यांनी केले.
     राजे समरजीत घाटगे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच ते भुदरगड तालुक्याच्या दौऱ्यावर ते आले होते . यावेळी ते भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते..
     यावेळी बोलताना राजे समरजीतसिंह पूढे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती सह चिंतामुक्त करायचे आहे असे म्हणणाऱ्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची चिंता मुक्त करण्याऐवजी चिंता वाढवली आहे. फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन प्रामाणीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर २८ कलमी अटी लादून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. या गोष्टीचा सरकारला जाब विचारण्यासाठी मंगळवारच्या मोर्चात हजारोंचा संखेने सहभागी व्हा..
    यावेळी गोकुळ चे संचालक बाबा देसाई ,बाजार समिती संचालक नाथाजी पाटील यांचीही भाषणे झाली..
   यावेळी भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार बाबा देसाई , व नाथाजी पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी  राहुल देसाई,अलकेश कांदळकर,योगेश परुळेकर,प्रा.हिंदुराव पाटील,संतोष पाटील,नामदेव चौगले,विलासराव बेलेकर,सुनील तेली,पं. स.सदस्या सौ.आकाताई नलवडे, अनंत डोंगरकर,दिलीप केणे,शहराध्यक्ष राहुल चौगले,भगवान शिंदे,बाजीराव देसाई,सुरेश सुतार,पी.बी.खुटाळे,विनायक देसाई,निवास देसाई,अमोल पाटील,रमेश पाटील,सुशांत मगदूम,ए. डी.कांबळे, अवधूत राणे,लखन लोहार,पांडुरंग वायदंडे,जीवन पाटील,आकाश पाटील,अमृत गुरव,विनायक शिंदे,दीपक डोंगरे,सतीश खोत,मयूर अस्वले,सचिन घरापणकर,आशिष आरेकर,किरण गुरव,अवधूत तानवडे,विकास पाडळकर,विकास चांदेकर,संतोष बरकाळे,आनंदा आमते,रामचंद्र पाटील,विक्रम पोवार,संजय भोसले,अमर वर्णे,बाबुराव पिंगळे,विनोद कांबळे, प्रसाद कांबळे सचिन देसाई,रणधीर गुरव,अविनाश कवडे,संजय पोर्लेकर,सतीश गायकवाड,अंकुश सारंग
यांचे सह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.
                       स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विनायक परुळेकर यांनी केले आभार युवा मोर्चाचे तालूकाध्यक्ष रणजित आडके यांनी मानले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा