भुदरगड तालुक्यात प्रथमच महिलांसाठी महिला महोस्तव भरणव्यात आला आहे .पंचायत समिती भुदरगड यांनी हा महोस्तव भरवला आहे .याचे उदघाटन आमदार प्रकाश अबीटकर यांनी केले यावेळी सभापती कीर्ती देसाई अध्यक्षस्थानी होत्या . भुदरगड तालुक्यात प्रथमच महिला बचत गटासाठी तालुकास्तरीय भुदरगड महोस्तव 46 महिला बचत गट स्टॉल यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे .यावेळी प्रमुख उपस्थिती जी प सदस्या सौ .रोहिणी अर्जुनअबीटकर ,सौ.रेश्मा राहुल देसाई,सौ.स्वरूपारणी सत्यजित जाधव,गटविकास अधिकारी श्रीमती माधुरी परीट,उपसभापती सुनील निंबाळकर,पंचायत समिती सदस्या सौ .स्नेहल परीट,सौ.सरिता वरंडेकर,सौ.गायत्री संदेश भोपळे,भाजप महिला तालुका अध्यक्षा पंचायत समिती सदस्या सौ .आकताई नलवडे उपस्थित होत्या.भुदरगड पंचायत समिती कडून महिला महोस्तव भरवून महिलांच्या बचतगटांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे .पहिल्याच दिवशी महोस्तव पाहण्यासाठी महिलांची गरद्दी लक्षणीय होती .महोस्तवा मध्ये अनेक प्रकारचे खाद्य स्टॉल लावण्यात आले होते . भेरवनाथ महिला बचत गट शेळोली या बचत गटाच्या प्लास्टिक पिशिव्या टाळण्यासाठी त्यांनी स्वतः विणकाम केलेल्या कापडी पिशव्या सर्वांच्या लक्ष वेधून घेत होत्या .तर खवय्यासाठी रक्ती मुंडी ताट लावण्यात आले होते . तिरवडे येथील महिलांचा मुस्लिम बचत गट ही या महोत्सवात सहभागी झाला होता . भुदरगड तालुक्यातील महिलांसाठी सोमवार 20 ते बुधवार 22 तारखेपर्यत हा महोत्सव चालणार आहे .यामुळे हा महोत्सव महिलांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
