बातमीपत्र

संचालक विशाल कडणे आणि अजय बागल यांच्या वतीने ईशान्य-मुंबई मध्ये सोसायट्यांसाठी थेट संवादाचे आयोजन

प्रतिनिधी - गृहनिर्माण संस्थांमधील सभादांच्या सोयीच्या दृष्टीने अपर निबंधक (गृहनिर्माण) यांनी दिनांक २९ जून २०२० रोजी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार, ड्रायव्हर्सना प्रवेश प्रतिबंधित न करणेबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. ह्याच्या आधारे मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्या पुढाकाराने मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्थामध्ये उद्भवलेल्या अडचणींवर सभासदाना मार्गदर्शन करण्यासाठी गृहनिर्माण संस्था सभासदांसोबत विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर करून संवाद घडवून आणण्याचे काम हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक विशाल कडणे, अजय बागल आणि सहकारी ईशान्य मुंबई विभागामध्ये करत आहेत. कोव्हीड १९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांमध्ये घर कामगार व वाहन चालक याना गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कामकाजाकरिता त्यांच्या प्रवेशाबाबत नियमावली तयार केली आहे. सदर नियमावलीच्या अनुषंगाने सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कामकाज करणे आवश्यक आहे. तथापि, काही सहकारी गृहनिर्माण संस्था त्यांना प्रवेश प्रतिबंधित करत असून त्या अनुषंगाने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी संस्थेच्या स्तरावर शासनाच्या निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने संदर्भीय शासन पत्रानुसार दिलेल्या निर्देशाच्या नुषंगाने अपर निबंधक (गृहनिर्माण) यांनी कळविले आहे कि घर कामगार, वाहन चालक याना गृहनिर्माण संस्थांमध्ये कामकाजासाठी प्रवेश देण्यासंदर्भात सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेत, तसेच या सूचनांच्या विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत. गृहनिर्माण संस्थांमधील पदाधिकाऱ्यांनी सांघिक भावनेने वागावे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या सभासदांना शक्य तितके सहकार्य करावे असे आवाहन मुंबई हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष प्रकाश दरेकर आणि  संचालक विशाल कडणे यांनी केले आहे


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा