कोरोना महामारी मुळे गोरगरीबांना रोजगार मिळत नसुन सामान्य माणसाला उपासमारीचा सामना करावा लागत आहे असंख्य लोकांचे रोजगार गेले तसेच वाहतुक सेवा बंद आसल्याने कामगारांची उपासमार होत आहे शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्यात यावी सामान्य जनतेचे हाल होणार नाहीत सामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा,राज्यातील बस सेवा सुरू करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतिने लोणार बस स्थानका समोर केन्द्र व राज्य सरकार विरोधात ठफडे वाजवून आंदोलन करुन लोणार तहसिलदार याच्या मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघपाल नागवंशी पनाड वंचित बहुजन अघाडी नेते,गजानन लिंबाजी सरदार (युवा कार्यकर्ता खळेगांव) अनित्य घेवंदे, विनायक मापारी, दत्ता राठोड सह बहु संख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
