मतदान हा लोकशाहीचा प्राण असुन मतदानापासून कोणीही वंचित राहु नये याकरिता खेड तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यातील येणवे येथे काही मतदारांची नावे मतदान यादीमधून लागलेली नावे पुन्हा सामाविष्ट करण्याबाबत शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार प्रकाशदादा वाडेकर यांनी खेड नायब तहसीलदार यांना निवेदन दिले.त्यावेळी शिवसेना विद्यार्थी सेना अध्यक्ष श्रीनाथदादा लांडे, शिवसेना उपविभाग प्रमुख राहुल मलगे, संतोष दौंडकर, उल्हास घोंगे व येणवे गांवचे ग्रामस्थ उपस्थित होते.
