बातमीपत्र

आहिरे येथे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक सन 2021-2025 या कालावधी साठी घोषित होऊन चिन्ह वाटप झाले प्रत्येक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून रिंगणात उभा आहे.खेड च्या पश्चिम भागातील संपूर्ण लोकांचे लक्ष आहिरे गावच्या निवडणुकीकडे लागले आहे.मा.सरपंच- शांताबाई सुरेश आहिरेकर यांनी आपल्या यापूर्वीच्या कालावधीमध्ये विविध विकास कामांच्या जोरावरती ग्रामस्थांच्या आग्रहाखातर पुन्हा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला त्यावेळी आहिरे गांवचे ग्रामस्थ बाळासाहेब आहिरेकर सरपंच,नारायण जगन्नाथ आहिरेकर वि.वि .सो. चेअरमन, सदाशिव साळवे मा.सरपंच, रामभाऊ आहिरेकर पाटील, तुकाराम आहिरेकर,तंटामुक्ती अध्यक्ष मुरलीधर साळवे,जेष्ठ कलावंत रघुनाथ केदारी,सौ. सुमन केदारी, मंगेश केदारी,विठ्ठल खेंगले जेष्ठ समाजसेवक अनिल साळवे,रामदासशेठ आहिरेकर,बिनविरोध विजयी उमेदवार-श्री.प्रविण प्रभाकर रोकडे (वॉर्ड क्रमांक-1),श्री.सुरेशभाऊ मनु आहिरेकर (वॉर्ड क्रमांक-2)यांनी मुलाखत देताना सौ.पुनमताई रामदास आहिरेकर व शांताबाई आहिरेकर यांची चिन्ह नारळ व शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून १ व २ वॉर्डातील उमेदवारांना विजयी करा अशी मतदार राजाला विनंती केली. त्यावेळी आहिरे गावचे ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा