बातमीपत्र

आहेरे ता.खेड जि.पुणे येथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नळ योजना करण्यात आली परंतु वीज बिल वेळेत न भरल्यामुळे विजेचे कनेक्शन कापले गेल्याने आदिवासी व मागासवर्गीयांना पाण्यासाठी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे असे मत आहेरे गावचे माजी संरपच शांताताई सुरेश आहेरकर यांनी व्यक्त केले.यावेळी सौ.आशाबाई सदाशिव साळवे,सौ.रेऊबाई भगवंता रोकडे,सौ.संगिता सुरेश साळवे,सौ.सुमन भरत केदारी,सौ.जनाबाई रघुनाथ केदारी,सौ.सुमित्रा विक्रम आहेरकर,आशा विजय साळवे,सिंधुबाई प्रभाकर रोकडे, झोपडपट्टी सुरक्षादल महाराष्ट्र राज्य सुरेश मनु आहेरकर व मनिषा रामदास आहेरकर यांनी आपले विचार व्यक्त करताना लवकरात लवकर नळ योजना पाणीपुरवठा शासनाने सुरू करावा अशी मागणी केली


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा