बॅक ऑफ महाराष्ट्र च्या नियम व अटी मुळे अल्पभूधारक शेतकरी ञस्त,शेतकर्यांना शासनाच्या पिक कर्जासाठी शासनाने सवलत देऊन सात-बारा,आठ-अ यांच्यावरती कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी.. कृषी पिक कर्ज कृषी विभागामार्फत शासनाने घातलेल्या जाचक अटी व निर्बंध कागदपत्रांची पुर्तता कमी करून शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळावे.पश्चिम पट्ट्यातील अल्पभूधारक शेतकरी या नियम व अटी मुळे ञस्त झाले आहेत.कोरोनाच्या पाश्र्वभूमीवरती संपूर्ण जगामध्ये लाॅकडाऊन असल्याने शेतकर्यांना शासनाच्या पिक कर्जासाठी शासनाने सवलत देऊन सात-बारा,आठ-अ यांच्यावरती कर्ज उपलब्ध करून द्यावे.असे मत जेष्ठ समाजसेवक भिमराव रखमा वाकचौरे,सदाशिव चिंधू साळवे,भगवान लक्ष्मण तांबे,मधुकर चिंधू साळवे,सुरेश मनु आहेरकर (महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षादल पुणे जिल्हा सचिव ),सौ.शांताताई सुरेश आहेरकर यांनी व्यक्त केले.
