अवैध रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे रस्त्याची झाली चाळण..या वाहनांना बंदी घाला अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा भाजपा नेते व माजी सभापती भगवानराव सानप यांचा इशारा लोणारतालुक्यातील लागतंच असलेले देऊळगाव कुंडपाल ते वझर आधव रस्त्याची ओव्हर लोड रेतीने भरलेल्या वाहनांच्या वाहतुकीमुळे १० ते १५ गावांच्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून हा रस्ता१८ किलोमीटर लांबीचा आहे येणाऱ्या पावसाळ्यात सादर रस्त्यावर स्थानिकांना अपघातांना सामोरे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.तरी शासनाने सदर अवैध वाहतुकीवर त्वरित बंदी घालून रस्त्याचे कॉंक्रेटीकरण करून द्यावे अन्यथा याच रस्त्यावर गावकऱयांच्या व भाजपा लोणार तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन येत्या ८ दिवसात करण्यात येईल असा इशारा भाजपा नेते व माजी सभापती भगवानराव सानप यांनी दिला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबारावजी मुंढे,विजय मापारी,प्रकाश नागरे,गजानन मापारी,शिवाजी सानप,दीपक चौधरी,उद्धव आलोके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
