समर्थ फाऊंडेशन खेड तालुका संस्थापक अध्यक्ष दावडी निमगांवचे सुपुत्र-ॲड.विजयसिंह बाबासाहेब शिंदे (पाटील) यांनी खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टर व कर्मचारी हॉस्पिटलमधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या बिलांमध्ये लुटमार करून प्रमाणांपेक्षा जास्त पैसे घेत असल्याने खेड तालुक्याचे प्रांताधिकारी- विक्रांत चव्हाण साहेब यांना निवेदन देऊन प्रत्येक हॉस्पिटल मध्ये माहीतीचे फलक (बोर्ड) लावण्याची विनंती केली.त्यावेळी मारूती सातकर,केशव आरगडे,रूपेश घारे,धनंजय पठारे,शंकर राक्षे,संतोष गोरडे,राहुल मलगे,सुजित टोपे, अजित घारे,सुरेश शेवकरी,एल. बी. तनपुरे,संदिप पोटवडे,अमित आरगडे,महेश शिंदे,संभाजी शिंदे,भाऊसाहेब तांबे,राजु चौधरी व गणेश म्हसाडे हे सर्व सामाजिक/ युवा कार्यकर्ते खेड प्रांताधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित होते.
