बातमीपत्र

संत गाडगे महाराज उद्यान चौक (सातरस्ता) येथे नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला

महानगर पालिका जी/दक्षिण विभागातील संत गाडगे महाराज उद्यान चौक (सातरस्ता) येथे नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 
लवकरच या ठिकाणी पदपथ आणि लोकांसाठी बसायची सोय,महालक्ष्मी पूल ते बी.जे.मार्गाला जोडणारा थेट रस्ता, पथदिवे,सीसीटीव्ही या सुविधांसोबतच सुशोभीकरणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे बदल केले जातील.भविष्यात इथे सौर ऊर्जा वापर व रेन वॉटर हार्वेस्टिंगही केले जाईल. या प्रकल्पासाठी नगरविकास विभागातर्फे आर्थिक सहाय्य मिळणार असून त्याबद्दल मंत्री मा.एकनाथ शिंदे जी यांचे मा.आदित्यजी ठाकरे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. 
खासदार श्री.अरविंद सावंत,महापौर सौ.किशोरी पेडणेकर,उपनेते श्री.सचिन अहिर,मा.आमदार सुनिलजी शिंदे,विभागप्रमुख श्री.आशिष चेंबूरकर,नगरसेवक रमाकांत रहाटे उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा