बुलडाणा/प्रतिनिधी : दिव्यांग कल्याण आयुक्तालया अंतर्गत चालविण्यात येणारी बुलडाणा येथील मूकबधिर निवासी विद्यालयाचे माहे मार्च महिन्याचेच वेतन जिल्हा समाज कल्याण अधिकारी व संबंधित वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांचे वेतन रखडले आहेत तर सन 2021-22 करिता माहे एप्रिल व मे असे दोन महिन्याचे वेतन तरतूद दिनांक 21 मे 2021रोजी दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांचेकडून जावक क्रमांक 21-22/3669 नुसार वाटप करण्यात आली आहे मात्र बुलडाणा येथील मूकबधिर निवासी विद्यालयातील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे त्यामुळे येथील कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली असून आधीच कोरोना महामारी मुळे सर्व जण त्रस्त आहेत तर काहींना नियमित औषध उपचार करावे लागतात तर काहींचे बँक कर्जाचे हप्ते रखडलेले आहेत अशा परिस्थितीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी व संबंधित वैसाका यांचेकडून वेतन अदा करणे बाबत कोणतीही कार्यवाही होतांना दिसून येत नसल्याने कर्मचारी त्रस्त झाले असून यातील काही कर्मचारी कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराने पछाडलेले आहेत त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.
