लोणार तालुक्यातील मौजे टिटवी येथे श्रीमती जिजाबाई रामचंद्र नाडे ही विधवा महिला आपल्या दोन मुलांसह वास्तव करून राहते.पतीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं.उत्पन्नाचे साधन काहीही नसल्याने रोजमजुरी करून घर संसार या माऊलीला करावा लागतो.कच्च घर शासनाच्या योजनेच घरकुल मंजूर असताना,सुरू करण्यासाठी देखील त्यांच्या कडे दमडीची सोय नाही.त्यामुळे तेही प्रलंबित आहे. सदर बाब गजानन पाटोळे यांच्या निदर्शनास आली.त्यांनी
त्यांचे वडील स्व.शेषराव अच्युतराव पाटोळे ग्रामसेवक यांच्या आज २६ वि पुण्यतिथी निमित्ताने या निराधार महिला भगिनीला ११०००/- आर्थिक मदत देऊन वडिलांची पुण्यतिथी साजरी करण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे सन 85 च्या दशकामध्ये त्यांचे वडील स्व. शेषराव पाटोळे हे देखील टिटवी येथे कार्यरत होते.त्यांच्या तत्कालीन कार्यक्षेत्रात दिलेली मदत निश्चित पावन पुण्यस्मृतिस अभिवादन करणारी ठरली. अश्याच पध्दतीने समाजपयोगी कार्य करून जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचा प्रयत्न समाजामध्ये झाल्यास...! खुप मोठं परिवर्तन या देशांमध्ये घडून येईल.वाढत चाललेली गरीब श्रीमंतिची दरी कमी होईल.असे प्रतिपादन या प्रसंगी गजानन पाटोळे यांनी व्यक्त केले.त्यानंतर सदर श्रीमती तोडे या महिलेला घरकुलाचे बांधकाम सुरू करणे बाबत नियोजन करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या.यावेळी इतर प्रगतीच व सुरू न झालेल्या घरकूलाना भेटी दिल्या.यावेळी भारत मापारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नारायण जाधव रोजगार सेवक श्री दिपक ज्ञानेश्वर पुनवे,श्री संतोस ज्ञानेश्वर पुनवे उपस्थित होते.
