लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली असून रात्रभर पाऊस कोसळला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकतीच पेरणी केलेल्या शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी बी बियाणे व खते खरेदी करून शेती मशागत करून शेतीची पेरणी केली होती परंतु 15 जून च्या रात्री अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीची लोणार तालुका अध्यक्ष बाबुराव मुंढे यांनी आज १६ जून रोजी शासनाकडे केली आहे.
