सलग आठ महिन्यांपासून पोलिसांना सातत्याने गुंगारा देणारा सराईत गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ७ अधिकाऱ्यांनी अखेर मुसक्या आवळल्या बेकायदेशीर शस्त्र बाळगणारा मध्यप्रदेश, बखाणी उमरती येथील या सराईत गुन्हेगार लाखनसिंग (२१,) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा क्रमांक ७ च्या पथकाने अटक केली असून नवघर पोलीस ठाण्यात १७/२०२१ रोजी सायंकाळी ६.१५ मिनिटांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यांच्याकडून १० देशी बनावटीचे पिस्तूले २, मॅगझीन, ६ जिवंत काडतुसे, मोबाईल, असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व द्रुतगती मार्ग मुंबईकडे जाणारी वाहिनी मिठागर गेट लगत एक इसम बनावट अग्निशस्त्रांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एका बातमीदाराकडून पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या पद्धतीने पोलिसांनी सापळा रचला होता .काही वेळातच एक व्यक्ती संशयित पद्धतीने वावरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच क्षणी त्याला भेटण्यास दोघे आले,तिघांची ओळख झाल्यानतर तिघेजण एकत्र जात असताना, समोरून पोलीस येताच अन्य दोघांनी तिथून पळ काढला. आणि एकाला पोलिससांनी ताब्यात घेतले. सदर इसमाची चौकशी केल्यानंतर त्याच्या जवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता, 10 देशी बनावटीचे पिस्तूले 2 मॅगझिन व 6 जिवंत काडतुसे सापडली. बेकायदेशीर पिस्तूले विकण्याच्या इराद्याने जवळ बाळगल्याची याची खात्री झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात 17/ 2021 कलम 3, 25 नुसार गुन्ह्याची नोंद केली. सदर,
आरोपीला न्यायालयाने 25 जून 2021 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे ,लाखनसिंग असे अटक केलेल्यांचे नांव आहे.
हा बखाणी मध्य प्रदेश येथील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अन्य पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समजते.
त्याच्यावर आर्म (ACT) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त ,अकबर पठाण ,एसीपी सिद्धार्थ शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर सुनयना सोनवणे ,पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण, नामदेव परबलकर ,स्वप्निल काळे, गिरीश जोशी, सुभाष मोरे ,संतोष गुरव, यांच्या पथकाने केली.
