शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे रविवारी पहाटेच्या सुमारास बी.आय.टी.चाळीतील तळ मजल्यावरील घरात पाणी घुसल्याने घरातील सर्वाना चाळीतील पाहिल्या मजल्यावरील गॅलरीत जाऊन उघड्यावर झोपायची वेळ आली लहानमोठ्यांसह वृद्धांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एवढेच नव्हे तर घरातील सर्व अन्नधान्य तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होत आहे.याकडे दरवर्षी मनपा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करत आहे.दरवर्षी होणाऱ्या त्रासातुन हे शासन स्थानिकांना कायमस्वरूपी दिलासा देईल कि नाही? याकडे मनपा अधिकारी प्रशासन लक्ष देणार कि नाही? दरवर्षी मनपा करोडोचा निधी नाले सफाई वर खर्च करते परंतु मुंबई मनपाची पोलखोल दरवर्षी पडणार पाऊस करत असतो हे दरवर्षी अनेक वृत्तवाहिन्या दाखवतात परंतु बी.आय.टी.चाळीतील रहिवाशांच्या समस्याचे निराकरण शासन करत नाही हा त्रास कितीवर्ष अजून सहन करायचा यावर मनपा कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.मा. मुख्यमंत्रानी या विषयात लक्ष घालून या नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे व झालेल्या नुकसानीची चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.
