साऊथ वेस्टन्स अमेरिकेन युनिव्हर्सिटी कडून कृषी क्षेत'काही माणसं आपल्या जीवनात यश संपादन करत, आपापल्या क्षेत्रात आदर्श निर्माण करतात. ध्येयनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत यशस्वीही होतात. अशा दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक यशस्वी उद्योजक व सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. प्रकाश भांगरथसर .. प्रा.प्रकाश भांगरथ .. या दोन शब्दातच विलक्षण जादू आहे. व या दोन शब्दांनी ते सर्वांना शहापूर तालुक्यातील एक आदर्शवत नामवंत व्यक्ती म्हणून सुपरिचित आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच औद्योगिक विश्वासी एकरूप झालेले कृषी क्षेत्रातील अलौकिक व्यक्तिमत्व. बोलण्या पेक्षा कृती करण्याला ते प्राधान्य देतात. शांत, संयमी, मितभाषी , प्रसंगी कणखर, निर्भिड, कल्पक, चातुर्य , चारित्र्य संपन्न, आणि अभ्यासू वृत्तीचे नेतृत्व म्हणून प्रा.प्रकाश भांगरथसर ओळखले जातात. ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष,व शिक्षक भारती संघटनेचे मार्गदर्शक तसेच तिसाई कृषी विद्यापीठाचे प्रा.प्रकाश भांगरथसर यांना चेन्नई येथे साऊथ वेस्टन्स अमेरिकेन युनिव्हर्सिटी कडून कृषी क्षेत्रातील अलौकिक कामगिरी बद्दल डॉक्टर ऑफ अॅग्रीकल्चर हि पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या उत्तुंग कामगिरी बाबत पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, विद्रोही पत्रकार व राष्ट्रीय महासचिव ,डॉ. राजन माकणीकर, व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) राज्याचे महासचिव कॅ. श्रावण गायकवाड यांनी डॉ.प्रकाश भांगरथसर यांची सदिच्छा भेट घेऊन मुक्तकंठाने प्रशंसा करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. सर्व सामान्य हितार्थ निर्णय, पारदर्शक कारभार, कर्तव्यदक्ष आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा व निष्कलंक चारित्र्य हे स्वभाव गुण त्यांच्या ठायी आहेत. कोणतेही काम हातात घेतल्यावर फायदे तोटे दूरगामी परिणामांचा विचार करून सखोल अभ्यास करून ते कामास सुरुवात करतात. हिच त्यांच्या कामाची खास हातोटी आहे .जनतेच्या हिताचे कार्य करणाऱ्या या नेतृत्वाने जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या हृदयसिंहासनावर आढळ स्थान निर्माण केले आहे. इंडो इस्राएल कंपनीच्या पदाधिकारी मंडळांवर प्रभावी काम करणाऱ्या पैकी ते उत्तम कुशल 'प्रशासक' बनले. स्वतःच्या कर्तृत्वावर सलग 4 वर्ष त्यांनी सेवा केली. सलग 25 वर्षापासून भांगरथसर कृषी सेवेत कार्यरत आहेत. ते शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आठ वर्षे सदस्य आहेत. छोटया आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना खात्रीशीर अर्थ सहाय्य उपलब्ध करून पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत दोन हेक्टरपर्यंत लागवड योग्य जमिन असलेल्यां शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत करण्यासाठी ते मार्गदर्शन करताना दिसतात. शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांना सढळ हस्ते मदत करणे, शेतीविषयक मार्केटिंग करणे, व ठाणे जिल्हा ग्रामीण बँकेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज योजनांची सविस्तर माहिती देऊन, शेती विषयक मार्केटिंग कसे करावे त्याचे सुसूत्रपणे नियोजन करण्यासाठी प्रा.प्रकाश भांगरथसर सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे कृषी तज्ञ म्हणून भांगरथ सर यांना इस्राईलला पाठवण्यात आले होते. केंद्र व राज्य शासन यांच्या वतीने कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात विविध योजना कार्यरत आहेत.त्या योजना आदिवासी विभागात शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यास ते मोलाची मदत करीत आहेत. पिक उत्पादन वाढवणे ,तसेच अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुसूचित जाती जमाती, महिला, दिव्यांग, व इतर शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी सरांच्या विशेष योजना आजही कार्यान्वित आहेत. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेती उत्पादन वाढवण्यासाठी व पिकांच्या संरक्षणाकरिता ते शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करून ते सक्रिय योगदानही देतात. शहापूर तालुक्यातील वेहळोली या गावातील काथ्याची वाडी या दुर्गम भागात माजी आमदार दिगंबर विशे , यांच्या मार्गदर्शनाखाली, निलेश चिंदरकर व अन्य सहकाऱ्यांनी 25 हजार विविध प्रकारची झाडे लावली आहेत. आदिवासी विभागातील शेतकरी, कष्टकरी कामगार या लाभार्थ्यांना आपली प्रगती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.जर शेतकऱ्यांनी आपल्या शहरी भागातील जर जागा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होईल असेही विनम्रपणे प्रा. प्रकाश भांगरथ सर सांगतात.
