बातमीपत्र

दोन ते तीन दिवसापासून सतत धार पाऊस पडत असल्याने लोणार तालुक्यातील परिसरामध्ये पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामध्ये मुख्यतः उडीद,सोयाबीन या पिकांना अक्षरशः कोंब येत आहेत यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे पेरलेल्या पिकांमधून अक्षरशः पाणी वाहत आहे.तरी शेतात पेरलेल्या मालाची कशा पद्धतीने सोंगणी करावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.या अशा परिस्थितीमध्ये शेतांमध्ये पेरलेले मालामधुन शेतीला लागलेला खर्च सुद्धा मिळतो का नाही ?असं सुद्धा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे तरी सततच्या पावसामुळे जे पिकांचे नुकसान झाले त्याकडे शासनाने लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर तलाठी व कृषी सेवक यांच्यामार्फत नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करावे व शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करावी आणि शासनाने पंचनाम्याला उशीर न लावता लोणार तालुका हा पूर्णतः ओला दुष्काळ म्हणून जाहीर  करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा