युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारचा पेट्रोल व डिझेल ,व गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करीत शिवसेना भांडुप विधानसभा मतदारसंघाच्या वतीने व युवासेनेच्या वतीने ३१ रोजी भाजपा सरकारचा जाहीर धिक्कार करीत सायकल रॅली काढून दरवाढीचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकार दररोज पेट्रोल व डिझेल मध्ये जुलमी वाढ करत असून, यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. एकीकडे जनतेला अच्छे दिन आणण्याची भूलावना करून केंद्रात सरकार आल्यानंतर मात्र नागरिकांना अक्षरशः महागाईच्या भस्मासुरात केंद्र सरकार लोटत आहे. याचा निषेध म्हणून आज शिवसेना व युवा सेनेच्या वतीने भांडुप पश्चिम विभागात सायकल रॅली काढून दरवाढीचा व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. नगरसेवक ,आमदार, विभाग प्रमुख रमेश कोरगावकर व युवा सेना विभाग समन्वयक विशाल सावंत व युवा सेना विभागाधिकारी अजय जठार, मयुरी गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोलचे दर 115 रुपये डिझेल दर 105 रुपयांच्या वर पोहचलेले आहे .दररोज सकाळी उठल्यावर आज किती वाढ झाली एवढेच नागरिकांना भोगावे लागत आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर साठ-सत्तर रुपये असताना भाजपने आंदोलन केले होते .आम्ही पेट्रोल डिझेल स्वस्त करू !अच्छे दिन आणू !अशी बतावणी त्यावेळी केली होती. आता मात्र सत्तेत असतानाही पेट्रोल , डिझेल दरवाढीबाबत भाजपा काढण्यास तयार नाही, नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे .पेट्रोल डिझेल दरवाढीचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंवर झाला असून ,यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होतोय. तेव्हाही झालेली दरवाढ तात्काळ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना युवा सेनेच्या वतीने भाजप सरकारचा जाहीर धिक्कार करीत सायकल रॅली काढून निषेध नोंदवण्यात आला .कोरोनाच्या संकट काळात दिवाळीच्या सणासूदीच्या दिवसात आर्थिक अडचणीत भर पडली आहे.सलग गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल व गॅसच्या दरात बेसुमार वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या निषेध आंदोलनात नगरसेवक उमेश माने, नगरसेविका दीपमाला बढे,संगीता गोसावी, उपविभाग प्रमुख सुरेश शिंदे, सुनंदा वाफारे,पराग बने , राजेंद्र मोकल, सर्व शाखाप्रमुख, महिला शाखा संघटक, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख,व युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
