खेड,पुणे येथील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष सेझ प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे नुकसान १५%परतावा नाही,प्रकल्पात नोकरी नाही, RPI (आठवले गट) महाराष्ट्र राज्य सचिव हारेश देखणे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्याच्या मातोश्री निवास्थानी करणार आंदोलन आर्थिक दुर्बल आदिवासी मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकरी बांधवांना शिक्षणाबरोबरच रोजगार मिळावा म्हणून शासनाने अंमलबजावणी केली SEZ मुळे कंपन्या प्रस्थापित झाल्या स्थानिकांना रोजगार मिळालाच नाही शेतकरी भुमीहिन झाले 15 टक्के परतावा मिळावण्यासाठी आदिवासी मागासवर्गीय शेतकरी बांधव त्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविण्यासाठी RPI (आठवले गट) महाराष्ट्र राज्य सचिव हारेश देखणे यांच्या नेतृत्वाखाली कनेरसर गावचे सुपुत्र जेष्ठ नागरिक काशीनाथ हजारे, प्रा. डॉ बाळासाहेब माशारे, ऋषी चव्हाण, अतिश कान्हूरकर, अंकुश कान्हूरकर, निलेश म्हसाडे, विश्वास कदम, भानुदास नेटके, व इतर मान्यवर न्याय हक्कासाठी शासन दरबारी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहे. कागदाच्या ढिगाऱ्यात हरवला आहे न्याय 15 टक्के परतावा मिळावण्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारल्याशिवाय दुसरा कुठलाच नाही पर्याय , कधी संपणार शेतकऱ्यांच्या व्यथा राजा असून भोगतोय सजा..
