बातमीपत्र

राज्यस्तरीय तेजभूषण साहित्यगौरव कांदबरी पुरस्काराने डॉ.क्षमा शेलार यांचा सन्मान

तेजभूषण बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था,महाराष्ट्र संचालित रंगीन काव्यधारा साहित्य कला मंच,महाराष्ट्र चौथे वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यात बेल्हा-जुन्नर येथील डॉ क्षमा संजय शेलार यांच्या ऋग्वेदकालीन दाशराज्ञ युद्धावर आधारित 'दशोराज्ञ' या कादंबरीला 'उत्कृष्ट कादंबरी' म्हणून राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
   कार्यक्रमाचे उद्घाटन आळंदीचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे व  नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संमेलनाध्यक्ष डाॅ.ख.र.माळवे, स्वागताध्यक्ष मो शकील ताज मो जाफरी उपस्थित होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, राष्ट्रीय कवी पुरुषोत्तम महाराज हिंगनकर,तेजभूषण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ भगीरथ,उपाध्यक्ष सुरेखा भगीरथ,सचिव भूषण बिऱ्हाडे,कोषाध्यक्ष तेजस्विनी भूषण बिऱ्हाडे,सहसचिव महेश सपकाळे,सल्लागार गोपाळ कळसकर,पुणे जिल्हा अध्यक्ष भारती नरवेलकर,पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय नरवलेकर,महिला सदस्य निलिमा सपकाळे,अनमोल सहकार्य शुभम धाबे,महेश वानखेडे,वामन सपकाळे,इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे उपस्थित होते.महाराष्ट्राच्या विविध भागातून कवी,कवयित्री, लेखक, साहित्यिक बहुसंख्येने उपस्थित झाले होते.सूत्रसंचालन सुनील गायकवाड,सौरभ नवले,मिना देवाजी सैंदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश सपकाळे यांनी केले.
    अतिशय नेटके आयोजन असलेल्या या कार्यक्रमात तेजभूषण बहुउद्देशीय संस्थेतर्फे साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ क्षमा शेलार यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा