ओबीसीचे राजकीय आरक्षण केंद्र व राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टाने स्थगित केले.भटक्या विमुक्त आणि ओबीसी ची जनगणना करण्यास कोर्टाने आदेश देऊन सुद्धा केंद्र व राज्यसरकार तयार नाही.केंद्र व राज्यसरकारचे नाकर्तेपणा उघड्यावर आणुन त्यांचा निषेध करण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर ओबीसी जनमोर्चा ने धरने आंदोलन केले.या आंदोलनात माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे,माजी आमदार टी.पी.मुंढे, ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र महीला मोर्चा प्रमुख प्रेमलाताई साळी ,ज्योती पाटील, ओबीसी जनमोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
