धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित धामारी निवडणूक सन २०२२ ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी निवडणूक लागली असून जय मल्हार ग्रामविकास पॅनल च्या उमेदवारांनी श्री कुलस्वामी खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन व श्रीफळ फोडून प्रचार रणधुमाळी ला सुरुवात केली.त्यावेळी प्रचार दरम्यान श्री खंडेराया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी सरपंच दत्तोबा विठोबा भगत दादा यांनी आपले विचार व्यक्त करताना निवड संधी आणि बदल या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्याआहे.संधी दिसताच निवड करता आली तर बदल आपोआप होतो.संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्यात कधीच बदल घडत नाही. सहकारी सोसायटी हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासाचा कणा मानला जातो विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे सहकारातून समृद्धीकडे वाटचाल होणे अत्यावश्यक व तितकेच महत्त्वाचेआहे आणि म्हणुनच सर्व मतदार बंधू-भगिनींनी जय मल्हार ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावेअसे आवाहान त्यांनी केले.यावेळी संतोष दत्तात्रेय शेळके,सुनील शिवाजी गायकवाड,अजित बबन पावशे,सचिन मल्हारी डफळ,देविदास शेळके,तुकाराम भगत,बाळासाहेब दगडू डफळ,सीमाताई शेळके,श्रीराम गणपत कापरे,बाळासाहेब शेळके,स्वातीताई मोहन डफळ सरपंच,रेखा सुरेश गायकवाड उपसरपंच,माधव सर्जेराव पावशे व इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
