बातमीपत्र

'COVID WARRIOR' चे प्रमाणपत्र आणि स्टेथोस्कोप भेट म्हणून देऊन त्यांचा सत्कार

राज्याचे परिवहन मंत्री श्री.अनिल परब व नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ.गजानन रत्नपारखी यांच्या हस्ते दोनशेहून अधिक डॉक्टरांना 'COVID WARRIOR' चे प्रमाणपत्र आणि  स्टेथोस्कोप भेट म्हणून देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.GPA(महाराष्ट्र मेडिकल जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन) आणि गुरुकृपा हार्ट फाउंडेशन यांच्या सौजन्याने दि.१३ फेब्रुवारी २०२२ रोजी हा कार्यक्रम करण्यात आला.सदर कार्यक्रम मुंबई येथील एम.आय.जी.क्लब बांद्रा येथे झालेल्या या सोहळ्यात AMA आणि MCVP पदाधिकाऱ्यांसह  डॉक्टर्स उपस्थित होते.या कार्यक्रमाला डॉ.पी.ममतोरा अध्यक्ष AMA,डॉ. शैलेंद्र सेक्रेटरी मकवप,डॉ.विवेकानंद जाजू अध्यक्ष GPA आणि डॉ राम चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.संगीताबरोबर उपस्थितांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी मिळाली आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा