बातमीपत्र

कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी श्री.रामराव बाजीराव दौंडकर पाटील यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवत कुलस्वामीनी यमाई माता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मायभूमीत श्री.रामराव बाजीराव दौंडकर पाटील यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पडला त्यावेळी त्यांची मुलं,मुली व श्री.शंकरराव बाजीराव दौंडकर पाटील भाऊ हे उपस्थितीत होते.त्याच प्रमाणे सौ.सुरेखा माधवराव नवले बहीण,श्री.जय हिंद रामराव दौंडकर पाटील मुलगा,श्री हनुमंत रामराव दौंडकर पाटील कनेरसर गावचे माजी सरपंच,श्री सुदामराव रामराव दौंडकर मुलगा,श्री ज्ञानेश्वर रामराव दौंडकर,श्री भास्कर हनुमंत दौंडकर नातू,श्री.जयदीप जय हिंद दौंडकर,श्री धनेश सुदाम दौंडकर,श्री गणेश सुदाम दौंडकर,श्री सिद्धेश ज्ञानेश्वर दौंडकर व सर्व कनेसर गावचे आजी-माजी सरपंच,व्हाईस चेअरमन,पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्या आई-वडिलांनी जिवाचं रान रक्ताचे पाणी करून लहानपणापासून मोठे केले त्याची जाण आणि आभिमान ठेवून दौंडकर कुटुंबीयांनी सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये साजरा केला.त्यावेळी सुनील शेठ पारख यांची उपस्थिती प्रार्थनीय झाली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा