डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या वतीने बरेच समाजोपयोगी जनहिताचे उपक्रम राबवले जातात कर्णबधिर मुलांना श्रवण यंत्र वाटप,वृक्ष रोपं ते वृक्ष संवर्धन तसेच गणेशोत्सव,नवरात्रोत्सव विसर्जनाचे हार फुलांच्या निर्माल्यापासून खात निर्मिती व शासकीय कार्यालये,निवास्थान,इस्पितळे व रस्त्याचे वरचेवर स्वच्छता अभियान सातत्याने राबविले जातात.आज डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या वतीने डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या १ मार्च जन्म शताब्दी दिनानिमित्त संपूर्ण मुंबईत नारळवाडी कब्रस्थान,चंदनवाडी कब्रस्थान,वरळीतील इस्त्राईल व ख्रिस्ती बांधवांची दफनभूमी तसेच सुन्नी कब्रस्थान येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.या स्वच्छता अभियानास सर्व श्री सदस्यांनी सहभाग घेतला तसेच सादर कार्यक्रमास महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
