जगामध्ये काही माणसे जन्माला येतात ती आपल्या व्यक्तिमत्त्वाने व उत्तुंग कर्तुत्वाने समाजामध्ये आपली उज्ज्वल परंपरा उमटवितात जनकल्याणचे कंकण हाती बांधून गोरगरिबांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारे व कायदा-सुव्यवस्था टिकण्यासाठी तत्पर असणारे पोलीस क्षेत्रामध्ये नदीसारखे कार्य करणारे व्यक्तिमत्व असामान्य बुद्धिमत्ता अफाट व्यासंग उध्दितीय स्मरणशक्तीची देणगी लाभलेले आदर्श गोसासी गावचे सुपुत्र पीएसआय मच्छिंद्र सोपानराव गोरडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आपल्या भूमीमध्ये खेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला.त्यावेळी आदर्श गोसासी गावचे लोकनियुक्त सरपंच संतोषभाऊ गोरडे,मारुती शेठ गोरडे,माणिक शेट गोरडे,माजी आदर्श सरपंच किसनराव गोरडे,विविध विकास सोसायटी चेअरमन संभाजी गोरडे,प्रकाश गायकवाड पोलीस पाटील,व्हाईस चेअरमन माऊली गोरडे,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सेवानिवृत्त झालेल्या जितेमॅडम,छाया गायकवाड,पार्वती गोरडे,सरस्वती गोरडे व खेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यशील पोलीस अधिकारी घोलप साहेब,रेपाळे साहेब,कोकणे साहेब,महेश टाकळकर व सर्व आदर्श गोसासी गावचे ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होत्या.
