ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात कुलस्वामिनी यमाईमाता कनेरसर येथून सर्व लाखो भाविक भक्तांचा माहसागर विठ्ठलाच्या दर्शनासाठी कान्हुपाठकांची पालखी घेऊन पंढरपूर कडे रवाना.. आली आषाढी वारी चला जाऊ पंढरपुरी या उक्तीप्रमाणे श्री.संत शिरोमणी कान्हुपाठक महाराज दिंडी सोहळा केंदूर या ठिकाणावरून प्रस्थान होऊन महाराष्ट्राच्या आराध्य दैवत कुलस्वामिनी यमाईमाता कनेरसर येथून सर्व भक्तांचा व संतांचा मेळा घेऊन पंढरपूर पायी दिंडी सोहळा मार्गस्थ.दिनांक २०.०६.२०२२ कनेसर गावच्या ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले.दिंडी चालक मालक ह भ प आगरकर महाराज,ह भ प साकोरे महाराज,ह भ प दत्ता महाराज माशेरे,त्याचप्रमाणे कनेरसर गावचे सुपुत्र ह भ प कैलास घाडगे यांनी पालखी सोहळ्याच्या रथाला बैल देऊन मानाचे स्थान पटकावले.त्यावेळी कनेसर गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबाजी शेठ अर्जुन दौंडकर,बबनराव भागुजी दौंडकर,मोहन शेठ दगडू दौंडकर,बाबाजी मार्तंड लोखंडे,हनुमंतराव रामराव दौंडकर माजी सरपंच कनेरसर व सर्व कनेसर गावचे ग्रामस्थ यांनी पालखी सोहळ्यासाठी लाख मोलाचे सहकार्य केले
