बातमीपत्र

इयत्ता १० वी च्या १०० टक्के निकालाचे दशक पूर्ण राधानगरी तालुक्यामध्ये सलग १० वर्षे विक्रम कागल तालुका कला, क्रीडा, शैक्षाणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित, श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली ता. राधानगरी या माध्यमिक शाळेचा गेली १० वर्षे १० वी चा निकाल १०० टक्के लागलेला असून, राधानगरी तालुक्यामध्ये या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात विक्रम केला आहे. वाकीघोल सारख्या दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या या माध्यमिक शाळेमध्ये २८० विद्यार्थी शिकतात. या संपूर्ण परिसरामध्ये ३० किमी अंतरामध्ये कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना केवळ श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांच्या परिश्रमाने गेली १० वर्ष या शाळेचा १०० टक्के निकाल लागलेला आहे. त्यामुळे वाकीघोल परिसरामध्ये शैक्षणिक उंची वाढली असून, शिक्षणाचा एक नवा हब तयार झालेला आहे. या शाळेमुळे गेल्या १२ वर्षात अनेक विद्यार्थी शिक्षित झाले असून ते अनेक क्षेत्रामध्ये नोकरी करत आहेत. या श्री महालक्ष्मी विद्यालयाचे संस्थाचालक श्री.अतुल जोशी यांनी २०१२ मध्ये या शाळेची सूत्रे हाती घेतली आणि वाकीघोल परिसरामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत. या निकालाची १० वर्षाची चर्चा संपूर्ण राधानगरी तालुक्यामध्ये होत आहे व त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. विद्यानंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा