बातमीपत्र

लोणार तालुक्यामधील सुलतानपुर येथील महावितरणाचा भोंगळ कारभार सुलतानपूर येथील वार्ड क्रमांक ५ मधील बस स्टँड डिपीच्या ट्रांसफार्मर अनेक दिवसापासून बिघडलेला आहे परंतु त्याची थातूरमातूर दुरुस्ती करून कमी दाबाचा विद्युत पुरवठा चालू आहे. त्यामध्ये अर्ध्या- अर्ध्या तासाला फ्यिज जाणे- डिओ जाणे ट्रान्सफर मधून धुर निघने आणि जाळ निघने अशा अनेक समस्या डीपीच्या आहेत.त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रात्री-अपरात्री वीज ग्राहकांची डोकेदुखी झाली आहे .ही समस्या त्वरित निकाली काढावी.वीज ग्राहकांच्या समस्या त्वरित निकाली काढण्यात याव्या अन्यथा दिनांक १४/०८/२०२२ ला स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महावितरण कार्यालया सुलतानपुर समोर उग्र स्वरूपाचे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा