बातमीपत्र

लोणार :- लोणार तालुक्यामधील ऊदनापुर येथील जिल्हा प्राथमिक शाळेने आगळावेगळा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा केला. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वेगळे -वेगळे पथक पाडण्यात आले.ज्यामध्ये लेझीम पथक ,देशभक्त पथक, झेंडा पथक ,जिजाऊ पथक आणि पंढरीची वारी अशा विविधता दाखवणाऱ्या पथकांचा समावेश होता. यासोबतच लेझीम नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरपुर असे योगदान या कार्यक्रमात दिसत होते आणि भर पावसात अनेक पालकांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यासोबत शिक्षकांनी लेझीमवर ठेका घेत अत्यंत उत्साहाने हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पाडला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा उदनापूर शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर सर,सहाय्यक शिक्षक निलेश जाधव सर,गजानन धोटे सर यांनी परिश्रम घेतले.तसेच शाळा व्यवस्थापन समिती,पोलीस पाटील तथा गावकरी मंडळींचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा