सुलतानपूर ग्रामपंचायत हद्दीतील समस्या तात्काळ निकाल काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यातआले जन आक्रोश आंदोलन सुलतानपूर ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्र. १,५,आणि ६ यामध्ये सार्वजनिक रस्त्याना गटारीचे स्वरूप आल्याने नागरिकांना रहदारीकरिता मोठी कसरत करावी लागत आहे.सुलतानपूर ग्रामपंचायत हद्दीतील समस्या पंधरा दिवसाच्या आत सोडवण्यात याव्या अन्यथा सुलतानपूर गावकऱ्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायत कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघपाल नागवंशी पनाड ,आनित्य घेंवदे,संतोष शिंदे पाटील ,अत्तर भाई, मुन्ना पटेल, पुरुषोत्तम गाडेकर भानदास पवार ,नागसेन पनाड शरद पवार पाटील ,अनंता टाकले, राजू राऊत ,साहेबराव झोरे, जावेद शिकलाल ,विशाल पनाड, किरण पनाड, राजहंस जावळे, प्रसेंजित पनाड साहेबराव वानखेडे इतर आणि गावकरी यांनी ग्रामपंचायत समोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं
