ऐतिहासिक संस्कृती शैक्षणिक राजकीय सामाजिक परिवर्तनाचे विद्येचे माहेर घरअसणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजे खेड तालुका होय खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्यील दुग्ध जनावरांना लांपी आजारापासून वाचविण्यासाठी कृषिप्रधान देशातील काळ्याआईचीसेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व गोधन वाचवण्यासाठी समर्थ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजय सिंह शिंदे पाटील यांच्या माध्यमातून लंपी आजारावर मात करण्यासाठी १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान समर्थ फाउंडेशनच्या वतीने खेड तालुक्यातील ३५ गावांना वाड्यावस्त्यां मधील पंधरा हजार जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले.त्यावेळी वरुडे गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती शेठ थिटे,मा.सरपंच भालचंद्र रोडे,नंदकुमार कातोरे,दिलीप चौधरी,राम पाटील,पोपट चौधरी,प्रल्हाद कांबळे,पोपटराव गोडसे व खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील आजी माजी सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.समर्थ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजयभाऊ शिंदे पाटील यांनी महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज ला दिलेली खास मुलाखत
