लोणार तालुका प्रतिनिधी
" जे का रंजले गाजले त्याशी म्हणे जो आपले " हा संताच्या ओळी सार्थक ठरवित मागील आठ वर्षा पासुन पारधी वाडी वस्तीत भाऊबीज साजरी करण्याचा दरवर्षी चा नित्यनियम लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील विवेकानंद परिवाराने या वर्षी सुद्धा कायम ठेवत हर्ष उल्हासात ता . २६ ला भाऊबीज साजरी केली .
वंचित , उपेषीतांच्या उत्थां णा साठी शासन विविध योजना राबवित असले तरी आज ही ह्या वसत्यां मध्ये " विकास " नावाला चा दिसतो . बेरोजगारी मुळे ह्या भागातील परिवारांसाठी सण उत्सव केवळ ऐकण्या व पाहण्या पुरतेच मर्यादित असतात . हीच बाब लक्षात घेवुन सुलतानपुर येथील विवेकानंद स्टडी सेंटर च्या वतीने सर्वात म्हत्वपुर्ण असलेला भाऊबीजे चा सण येथील पारधी वाडी वस्तीत जाऊन त्यांच्या मुलाबाळांणा नविन कपडे , आई बहीणीना साडी चोळी , नवीन भाडीं , चटई व मिठाई देऊण त्यांच्या परीवारां सोबत हर्षउल्हासात भाऊबीज साजररी करण्यात आली .
या वषी शंभर रुपयांमध्ये तेल , दाळ ,साखर असा आनंदा चा शिदा शासनाच्या वतीने स्वसत धान्य दुकांना मार्फत देण्याची घोषणा करण्यात आली होती पण हा शिधा दिवाळी संपुन ही पोहचुच शकला नाही मात्र " विवेकानंद परिवाराच्या वतीने सण उत्सवात प्राप्त झालेल्या ह्या अल्पशा मदतीने उपेक्षित समाज बांधवांच्या चेहर्या वर चा आनंद ओसांडून वाहत होता .
यावेळी मुंबईचे दुय्यम निबंधक अधिकारी प्रदिप कडाळे , प्रा. आनंद झोरे , पत्रकार वसंत जुमडे , प्रा . विजय खेत्रे , विजय ढव्हळे , पुरवठा अधिकारी विकास राजपुत ,पत्रकार सागर पनाड , सुनिल हरकाळ , भागवत पडघाण याच्या पुढाकाराने स्टडी सेंटर चे युवक गोपाल शेळके , दामोधर कुडके , कृष्णा सास्ते , प्रज्वल काटकर , कृष्णा जुमडे , गणेश सुरडकर ,ऋषिकेश चाकोतकर , अमोल शिंदे आदिनी संपन्न केला .
