बातमीपत्र

सुजन फौंडेशन या संस्थेच्या वतीने सौ.मंगलताई शेवकरी यांना जिजाऊ सावित्री पुरस्कार प्रदान

पुणे जिल्हा तालुका जुन्नर शिवरायाची जन्म भुमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर सुजन फौंडेशन या संस्थेच्या वतीने कार्यक्रम करण्यात आला.लोक क्रांती सेनेच्या प्रदेश संघटक सौ.मंगलताई शेवकरी यांना गड शिवनेरी किल्ल्यावर पुरस्कार प्रदान झाला.सौ.मंगलताई शेवकरी ह्यानी समाजासाठी खुप कामे केली आहेत.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार ओबीसी जिल्हा अध्यक्षा काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षा,दक्षता कमिटि सदस्या महाराष्ट्र माळी महासंघ उपाध्यक्षा अशी अनेक पदे भुषवली आहेत.खेड तालुक्यातील खंबीर महिला म्हणून सौ.मंगलताई यांची ओळख आहे.या कार्यक्रमा साठी महाराष्ट्रातुन कार्यक्रते शिव प्रेमी उपस्थित होते.सुजन फौंडेशन संस्थापक अजित जाधव,ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक संपत जाधव,कैलास जेजुरकर,मयूर दैऊडकर,दिपाली शेवकरी,किर्ती शेवटी,संतोष वराडी,सौरभ खूळे,विश्वनाथ सेवेकरी आदि मान्यवर उपस्थित होते अशी माहिती लोक क्रांती सेनेच्या राष्ट्रीय नेत्या सौ.कांताताई पांढरे यांनी दिली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा