बातमीपत्र

देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी हे मुंबई मधिल अनेक प्रकल्पांच्या उदघाटनाकरिता आले असता मुंबई मधिल बीकेसी येथिल मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण मुंबई मधून भाजपा कार्यकर्ते व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांनी व मुंबईकरांनी तुफान गर्दी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला तुफान गर्दी केली.त्यातच वरळी विधानसभा नवनिर्वाचित विधानसभा समन्वयक प्रशांत गवस व विधानसभा संघटक संजय गायकवाड यांच्यावर वरळी विधानसभेतून जास्तीत जास्त लोकांना सभेला घेऊन जाण्याची जबाबदारी दिली असताना वरळीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी विधानसभेतून १३ बसेस भरून व काही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या बाईक,चार चाकी गाड्या भरून एक शक्तीप्रदर्शन केल्याचे चित्र दिसत होते.वरळी विधानसभा या ठिकाणी शिवसेनेचे तीन आमदार असताना देखील बाळासाहेबांची शिवसेना वरळी विधानसभेतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी युवा,युवती तसेच शाखा प्रमुख,उप विभाग समन्वयक,वार्ड समन्वयक,वार्ड संघटक यांनी मोठ्याप्रमाणात शक्ती प्रदर्शन करत वरळी विधानसभेत मोठे आव्हान उभे राहील असे चित्र निर्माण केल्याचे दिसत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा