रविवार, दिनांक १९ मार्च रोजी ठाणे महिला बचत गटाच्या अध्यक्षा रूपाली जाधव (जिल्हा संघटिका,प्रहार जनशक्ती पक्ष) यांनी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यशोधन एज्युकेशन ट्रस्ट,शास्त्रीनगर,ठाणे येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.प्रमुख अतिथी म्हणून ठाणे वार्ताच्या लेखिका कस्तुरी देवरुखकर तसेच डाॅ.अक्षता पंडित उपस्थित होत्या.शाल,श्रीफळ अन् पुष्पगुच्छ देऊन बचत गटातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन केले.सप्तरंग,श्री विद्या,जय मल्हार,रायगड,प्रतापगड,विशाळगड,सह्याद्री,पंचगंगा,हरी ओम,मैत्रीण इत्यादी बचत गटांमधील प्रमुख आणि सर्व महिला सदस्यांनी येथे मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता.युवा एक्सलंट टीमने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.यावेळी महिलांकरता विविध मनोरंजक खेळाचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते.
संगीता पाटील,वर्षा त्रिभुवन,राजश्री गवस,अस्मिता चव्हाण,आश्विनी लकीमाळे या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले.या विशेष कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी सर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.
"आजच्या काळात आर्थिक,सामाजिक उन्नतीसाठी महिलांनी संघटित होणे गरजेचे आहे.महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गृहिणीच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करत आहोत.जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.त्यामुळे गृह उद्योगांना देखील चालना मिळेल." असे मत बचत गटाच्या अध्यक्षा रूपाली जाधव यांनी व्यक्त केले.
