लोणार तालुक्यातील बीबी येथे 26 मार्च रोजी झालेल्या बैठकीत बीबी किनगाव जट्टू सर्कलच्या पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश खंडागळे तर उपाध्यक्ष उद्धव आटोळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून तळागाळातील ग्रामीण भागातील पत्रकारांना सोबत घेऊन काम करणारे पत्रकारांच्या हितासाठी लढा देणारे आणि अन्यायाला वाचा फोडणारे सत्य मांडणारे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढण्याची जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडेन असेही मत रमेश खंडागळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले आहे. यावेळी संघटनेचे सचिव काशिनाथ राऊत,सहसचिव भागवत आटोळे,कार्याध्यक्ष मधुकर मोहिते, कोषाध्यक्ष शीलवंत इंगळे,सदस्य प्रदीप चव्हाण,ऋषिकेश दंदाले,सुनील इंगळे,ब्रह्मानंद वाकोडे,संतोष गुलमोहर,रोशन चव्हाण,नामदेव सोरमारे,राम जाधव,दिनकर काकड,देवानंद सानप,अशोक मुंडे,शरद गीते,राजकुमार मुळे, अभिजीत आडे,राजू खार्डे,काशिनाथ काळे,दिलीप राठोड,भागवत चव्हाण,सोपान डहाळके,गणेश खंड,दीपक पिंपळे आदी पत्रकार यांच्या उपस्थितीत अध्यक्ष रमेश खंडागळे,उद्धव आटोळे यांना शाल श्रीफळ पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
