कांचन इयत्ता पाचवी ते दहावी अशी सहा वर्षे श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली शाळेमध्ये शिकत होती.दररोज जवळपास १२ किलोमीटर अंतर रोज चालत शाळेला यायची.शाळेचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी जंगलातील रस्त्यावरून अतिशय खडतर प्रवास करायची वाटेत गवारेडा,अस्वल असे जंगली प्राणी असायचे,तसेच साप विंचू असे सरपटणारे जीव कायम वाटेत भेटायचे पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत तिने आपले शिक्षण पूर्ण केले.
तीच घर म्हटलं तर मातीच,कौलारू वडील हिंदुराव वडाप करणारे,परिस्थिती अगदी गरिबीची त्याचबरोबर आपल्या भागामध्ये लाईटची चा अभाव कायम एम.एस.इ.बी.चा प्रॉब्लेम आणि पाऊस तर प्रचंड पाऊस असा की वर्षातील पाच महिने शाळेला येताना तीन- तीन ओढे,नाले पार करायला मानवी साखळी करायला लागत असते. या सर्व अडचणींवर मात करत तिने जिद्दीने आपल्या शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं.महाविद्यालयीन शिक्षणासाठी आजरा येथे राहिली.त्यानंतर पोलीस प्रशिक्षण आणि पोलीस परीक्षेचे तयारी करण्यासाठी ती कोल्हापूर या ठिकाणी राहिली.आणि अशा पद्धतीने ती खडतर प्रवास करत करत आज यशस्वी झाली आहे.आज तिने घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले मुंबई पोलीस दलामध्ये तिची सार्थ निवड झाली.
तिच्या पुढील भविष्यासाठी सर्व शिक्षकांच्या कडून खूप खूप शुभेच्छा देऊन तिच्या यशामध्ये संस्थेचे सचिव माननीय श्री अतुल जोशी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांच्या शुभेच्छा नेहमीच कांचन सोबत आहेत असे वक्तव्य शाळेचे मुख्यध्यापक व्ही.पी.पाटील सर यांनी व्यक्त केले.
