कारेगाव:- लोणार तालुक्यामधील कारेगाव येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेला सकाळी १०:०० वाजता ही सुरुवात करण्यात आली होती. ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक साहेबांनी अनेक विषयाला विस्तारित स्वरूपात ग्रामसभेमध्ये अनेक आसे मुद्दे मांडण्यात आले होते. मुध्ये :- १) स्मशानभूमी मध्ये महादेवाची मूर्ती स्थापन करणे स्मशानभूमीला सुशोभीकरण करणे, २) गावामध्ये नवीन ट्रांसफार्मर बसवणे रमाई आवास योजनेची पाठपुरवठा करणे.३) नवीन भूमिगत गटार नालीचे काम करणे. ४) गावामधील नालीचे साफसफाई करणे. ५) गावामध्ये पाणीपुरवठा करणे. ६)गावांमधील दारूबंदी करणे ७) गावातील प्रत्येक पोलवरील लाईट लावणे. ८) गावामध्ये घंटागाडी फिरवणे. ९) जलजीवन योजना कशा स्वरूपाची आहे याची सविस्तर माहिती देणे. १०) गावातील पाण्याच्या टाक्या भरणे. आणि दर १५ दिवसांनी टाक्या धुवून ब्लिचिंग पावडर टाकने. गावामध्ये दोन कुप नलिका आहे. त्या दुरुस्ती करणे व त्या भोवताली घाणीचे साम्राज्य आहे ते साफसफाई करणे. व गावातील दारू बंदीचा मुदा व घटा गाडी आणि नाली साफ -सफाई करणे हा मुद्दा गावकऱ्यांनी सर्वात जास्त उचलून धरला होता. आतापर्यंत ग्रामपंचायतने साहा महिने उलटून सुद्धा गावातील एकही नाली साफ -सफाई केलीच नाही. व तसेच गावामध्ये सहा महिन्यात एकही दिवस घंटा गाडी कचरा घेण्यासाठी गावामध्ये फिरवण्यात आली नाही. व गाव मध्ये गुरांना पाणी पिण्यासाठी हैऊद आहे.तो हैऊद आठ ते दाहा दिवसांनीं साफसफाई करण्यात यावे. आणि ग्रामपंचायत ही सतत बंद राहते हा मुद्दा सुध्दा भरपूर तापला होता. ग्रामसेवक साहेबांनी आतापर्यंत दोन ते तीन दिवसाआड ग्रामपंचायत ऊगडत आसतात. या मुद्याला हात घालताच ग्रामसेवक साहेब यांनी विषय बदलत पळ काढण्याचा प्रयत्न केला. आशा समस्यांनी विळखलेल्या ग्रामपंचायत आता तरी जाग येते का आशी आशा ग्रामस्थांना लागुन आहे. आज जे मुद्दे ग्रामसभेला घेण्यात आले ते फक्त कागदावरच राहतात ग्रामसेवक साहेब हे आमलात सुध्दा आनतात का याकडे गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.या ग्रामसभेला गावातील नागरिक आणि महिला सुध्दा बहुसंख्येने उपस्थित होते.
साप्ताहिक बातम्या
विलवडे स्थानकात थांबा...
Sep 12, 2026
