बातमीपत्र

मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात दलित पँथरचा ५१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा..

मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी दलित पँथरचा ५१ वे वर्धापनदिना निमित्ताने महाराष्ट्र राज्यचे उत्पादन शुल्क राज्य मंत्री शंभोराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्येक्रमाची सुरुवात झाली अध्यक्षस्थान दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांनी भुषविले.त्यावेळी दलित पँथर विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्ष शुभम सुखदेव सोनवणे यांनी दलित पँथरच्या ५१ वे वर्धापनदिना सोहळ्याचे आयोजन एकदम चांगले प्रकारे केले होते.त्यावेळी दलित पँथर संघटना कार्यकर्ते राज्य भरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये अनेक महिला भगिनी सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्यचे उत्पादन शुल्क राज्य मंत्री शंभोराजे देसाई यांनी पद्मभूषण नामदेव ढसाळ संस्थापक अध्यक्ष यांनी दलित पँथर ही संघटना दलित पिढीत शोषित समाजाच्या हितासाठी उभी करून अन्याय विरुद्ध लढून संघटना मजबूत केली.त्यांचा वारसा पुढे घेऊन सुखदेव तात्या सोनवणे यांनी विश्वरत्न विश्व भुषण कायदा तज्ञ भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूरोगामी विचारांची जबाबदारी व दलित पँथर संघटना मजबूत करण्याचे ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून संघटना मजबूत करण्यासाठी सर्व समाजातील बांधवांना बरोबर जोमाने घेऊन पुढे चालेल आहेत.असे मत व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आम्ही सर्व जण त्यांना काही अडीअडचणी आल्या तर मदत करुन सोडविण्यासाठी तत्पर राहू त्यावेळी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी लेखक कवी अशोकराव टाव्हरे.यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की नामदेवराव ढसाळ हे पुर कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला असून त्यांनी मुंबई सारख्या शहरात येवून दलित पँथरचा माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन त्यांचे धन्यवाद मानले त्यावेळी कनेरसर गावचे सुपुत्र.दिलीपराव माशेरे . सुहास दौंडकर.अमित खरपुडे.अक्षय गायकवाड.बाबा हजारे.भिमराव सोनवणे.तानाजी घाडगे.पाणी हाक्क परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष परमेश्वर चौधरी.. विठ्ठल पवार.पुर कनेरसर पाबळ.वरुडे.अनेक पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा