बातमीपत्र

अपंग वृद्धांसोबत वेदीक्युअर ट्रस्टचा अनोख्या पद्धतीने वैलेंटाइन डे साजरा

मुंबई- वैलेंटाइन डे म्हटले की आजची तरुण मंडळी आपल्या प्रेयसी सोबत तर कोण आपल्या प्रियकरा सोबत हा दिवस साजरा करत असतात. पण ज्या आई-बाबांनी आपल्याला लहानाचे मोठे केले प्रेम दिले त्या आई बाबांना मात्र आज काहींनी वृद्धश्रमात सोडून दिले आहे. अशा वृद्धांच्या आणि अपंगाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी बुधवारी वैलेंटाइन डे निमित्ताने महालक्ष्मी येथील किंग जॉर्ज व्ही मेमोरियल वृद्धश्रमात अपंग  वृद्धांसोबत वेदीक्युअर वेलनेस चॅरिटेबल ट्रस्ट ने वैलेंटाइन डे साजरा केला. यावेळी त्यांना संयुक्त उपचार पद्धतीचे मार्गदर्शन केले. तसेच मोफत तपासणी शिबीर आणि गुलाब देऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. यावेळी वेदीक्युअर चे जीएम डॉ. राकेश सिंह आणि त्यांच इतर सहकारी डॉक्टर उपस्थित होते.
डॉ. अनिल पाटील यांची ही सामाजिक संस्था आहे. यावेळी संयुक्त उपचार पद्धतीद्वारे येथील वृद्ध रुग्णांना आरोग्य बद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांची तपासणी करण्यात आली. येथील एकूण 58 वृद्धांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. डॉ अनिल पाटील यांची ही संस्था नेहमी आरोग्यासाठी तसेच आयुर्वेद उपचार याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी काम करते तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. आजच्या प्रेमाचा दिवस आहे त्याच्या पर्शवभूमीवर तरुणांना देखील यातून एक संदेश देण्यात आला आपल्या आई वडीलांवर प्रेम करावे आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी असा संदेश ही देण्यात आला.
 
वेदीक्युअर वेलनेस ट्रस्ट ही एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेचे संचालक डॉ. अनिल पाटील आहेत. वेदीक्युअर संस्थेचे मुंबई सह महाराष्ट्र मध्ये क्लीनिक देखील आहेत. तिथे संयुक्त उपचार पध्दतीने तसेच आयुर्वेदिक पद्धतीने उपकजार केले जातात.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा