Turn off for: Marathi
जय महाराष्ट्र शिक्षक कर्मचारी सेना
नोंदणी पूर्व पहिली सर्वसाधारण सभा मुंबईतील खाजगी प्रा अनु आणि विना अनुदानित शाळातील शिक्षक व कर्मचारी यांच्या साठी एकही सक्षम आणि अधिकृत संघटना कार्यरत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन सर्वानी एकत्र येऊन जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना या नावाने संघटना स्थापन केली . शनिवार दिनांक ७.४.२०१८ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत घाटकोपर येथील वनिता विकास मंडळ सभागृहात १५० सभासदांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली या सभेला घाटकोपर, कुर्ला,चेंबूर, गोवंडी मानखुर्द, परेल दादर, मुलुंड, विक्रोळी भांडुप, गोरेगाव ,दहिसर, कांदिवली बोरिवली माहीम सायन या विभागातील विविध माध्यमातील ५४ शाळातील प्रत्येकी दोन, तीन शिक्षक याप्रमाणे १५० शिक्षक व कर्मचारी हजर होते सभेच्या सुरुवातीला उपस्थित सभासदां पैकी सौ. पूर्वा सकपाळ, श्री गणेश कणसे, श्री संभाजी घाडगे, सौ शोभा यमगर यांनी आपली मनोगते व्यक्त केली संघटनेचे संस्थापक श्री विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या नियुक्तीला सभासदांची मंजुरी घेण्यात आली.सभेचे सूत्र संचालन श्री विकास कांबळे यांनी केले सभासदांच्या सहमतीने संघटनेच्या नियमावलीचे (घटनेचे) वाचन केले व त्याची मंजुरी घेतली.सभेला उपस्थित असलेल्या सल्लागार सौ प्राजक्ता भाटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व counsellor (समुपदेशक) किती आवश्यकता आहे याचे महत्व विशद केले.शेवटी संयुक्त सरचिटणीस श्री संदीप परब यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहिर केले
