बातमीपत्र

ओम साई मित्र मंडळाच्या अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न

मुंबई,दि.१७:भांडुप मधील ओम साई मित्र मंडळचे कार्य संस्थेला निश्चितच प्रेरणादायी असुन, सुसज्ज अभ्यासिका आज पासून सर्व सुविधा युक्त सुरू झाली आहे, या अभ्यासिकेतून  विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, तुम्हाला हेवा वाटावा असी सुंदर वास्तू उभी राहिली आहे, या संधीचे सोने करावे अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक ११४ चे शिवसेनेचे लोकप्रिय नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी  भांडुप येथे 
व्यक्त केले.
ओम साई मित्र मंडळ , गणेश नगर येथे , स्टील रेलिंग ,अ भ्यासिकेचे नूतणीकरण,व भव्यदिव्य शेडचा लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला त्या वेळी नगरसेवक रमेश कोरगावकर हे मार्गदर्शन करताना बोलत होते.
नगरसेवक रमेश कोरगावकर यांच्या प्रयत्नातून व त्यांच्या विकासनिधीतून विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला होता त्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर दत्ता दळवी हे उपस्थित होते. व्यासपीठावर, भांडुप विधानसभा मतदारसंघातील सुरेश शिंदे, सुनंदा वाफारे, राजेश कदम, संदीप मयेकर, राजेश सावंत, नंदू पाटकर, वासुदेव मंचेकर, शलाका सातोषे, अनुराधा मातोंडकर, पूजा नारकर, भागेश्री गवस, शांताराम चव्हाण, रामचंद्र आंग्रे, रमेश सुर्वे, राजेश चव्हाण, रघुनाथ धनावडे,अंनत शिंदे तसेच , मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर मा, नगरसेविका अनिषा  माजगांवकर,नंदू घोगळे, कैलास पाटील, सुनील नारकर ad.जयसिंग बनकर, आजी माजी व नवनिर्वाचित पदाधिकारी, पुरुष व महिला सेना मनसे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते
नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी भांडुप येथे अनेक समाजपयोगी उपक्रमात सहभागी झाले आहेत, या विभागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेऊन या विभागात २८८ विकास कामांचा समावेश असल्याचे शाखाप्रमुख राजेश कदम यांनी सांगितले. या प्रसंगी ११ विकास कामांकरीता             ४० लाखांचा निधी वापरला गेल्याचे  शाखाप्रमुख राजेश
 कदम यांनी  विविध विशेष कामांचा आढावा घेताना  सविस्तरपणे मुद्देसूद माहिती दिली. रमेश कोरगावकर यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ११४ मध्ये जनहिताची विविध कामे सुरू असलेल्या कामांची पाहणी स्वतः कोरगावकर करित असल्याचे कदम यांनी सांगितले.यावेळी, दत्ता दळवी, सुनंदा वाफारे, सुरेश शिंदे, संदीप जळगावकर यांनी कोरगावकर यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या विविध प्रकारच्या विकास कामांची स्तुती करुन ओम् साई मित्र मंडळाच्या कार्याची प्रशंसा करून अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे व  उज्वल परंपरा कायम राखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आशा व्यक्त केली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशाखा प्रमुख समीर नार्वेकर यांनी छान केले. व  मंडळाच्या कार्याची माहिती विजय राणे सांगितली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व प्रतिनिधींनी मेहनत घेतली होती


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा