बातमीपत्र

पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा वसई युनिट यांचे कडून करोडो रुपयांचा गुटखा जप्त

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खनिवाडे टोलनाका येथे अवैधरित्या महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मीळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा वसई - पालघर यांनी खानिवडे टोलनाका येथे सापळा रचून ट्रक क्रमांक एम.एच. ०४ सी.पी.४६४२ व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच. ०४ ची.पी. ५७७२ या संशयित वाहनांना थांबवून त्याची पाहणी केली असता विमल गुटखा व तंबाकूने भरलेले १५९ गोणी हस्तगत करण्यात आल्या एकूण अंदाजे १ करोड ५ लाख किमतीचा माल दोन्ही वाहनात सापडला. दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेऊन मा. सह. आयुक्त अन्नव प्रशासन विभाग,वागले इस्टेट,ठाणे यांना पुढील कारवाई साठी पाठवण्यात आले.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!

   


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा